क्रीडाताज्या बातम्यारायगड

“सुपर लीगचा हिरो पंकज इटकर, मिळवली आमदारांकडून शाबासकीची बॅट”


पनवेल | क्रीडा प्रतिनिधी
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजपचे युवा नेते आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस ५ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पनवेल तालुक्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या 16 वर्षांखालील संघाचा कर्णधार व प्रमुख फलंदाज पंकज प्रकाश इटकर याचा विशेष सन्मान करण्यात आला.

पंकज इटकरने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत दमदार खेळ करत रायगड संघाला सुपर लीग फेरीत पोहचवले. पाच सामन्यांमध्ये 322 धावा करताना त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली, तर गोलंदाजीतही प्रभावी कामगिरी करत 22 बळी घेतले. या अष्टपैलू कामगिरीबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते त्याचा इंग्लिश विलो बॅट देऊन गौरव करण्यात आला.

पंकज इटकर सध्या पनवेल येथील मिडल क्लास सोसायटी क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षक रवी सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

या सन्मान सोहळ्याला रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सदस्य प्रदीप खलाटे, सुमित झुंझारराव, विनय पाटील, सुयोग चौधरी व पंकजचे वडील प्रकाश इटकर उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button