सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे खोपोली पोलिसांनी उकलला गुन्हा – टोळी जेरबंद
ताकई फाटा चोरीप्रकरणी मोठा खुलासा; पोलिसांचे पिंपरी-गुजरातपर्यंत सर्च ऑपरेशन

- खोपोली : पोलीस ठाणे हद्दीतील ताकई फाटा येथील एका इलेक्ट्रिक दुकानात ३ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री चोरी झाली होती. दुकानाच्या खिडकीतून प्रवेश करून चोरट्यांनी सुमारे ३.२० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक आँचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फूटेज आणि मोबाईल विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा तपास करून खोपोली, पुणे, नाशिक व गुजरात येथून एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली.
या कारवाईत १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये वायर बंडल्स, कॉपर बॉक्सेस, कंट्रोलर, PLC केबल्स यांचा समावेश आहे. तसेच चोरीसाठी वापरलेली टाटा योध्दा पिकअप व एक ऑटो रिक्षा देखील जप्त करण्यात आली असून एक रिक्षा ही पूर्वी चोरीला गेली असल्याचं निष्पन्न झालं आहे.
अटक आरोपी हे उत्तरप्रदेश व महाराष्ट्रातील असून यापैकी अनेक आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सद्यस्थितीत सर्व आरोपी ११ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत आहेत.
- अटक करण्यात आलेले आरोपी:
1. झुबेर एहसान शेख (३४) – आजमगड, उत्तरप्रदेश
2. आलम युसुफ मणियार (३४) – रायबरेली, उत्तरप्रदेश
3. दीपक कपिलदेव तिवारी (२२) – बलरामपुर, उत्तरप्रदेश
4. रामबिलास चिकनू यादव (३२) – सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश
5. झुबेर बहाब मेमन (२९) – मुंब्रा, ठाणे
6. सिराउद्दीन इबारतुल्ला खान – चिखली, पुणे
(सर्व आरोपींचा पूर्वगुन्हेगारी इतिहास आहे व विविध पोलीस ठाण्यांत चोरी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.)
हस्तगत मुद्देमाल:
पॉलीकॅब कंपनीचे विविध प्रकारचे वायर बंडल, केबल्स, कॉपर बॉक्सेस, पी.एल.सी. कंट्रोलर व प्रोग्रामिंग केबल्स
एकूण किंमत: ₹३,२०,५००/-
गुन्ह्यात वापरलेली वाहने:
1. टाटा योध्दा पिकअप – ₹४,००,०००/-
2. बजाज ऑटो रिक्षा – ₹९०,०००/- (ही रिक्षाही चोरीची असून मिरा-भाईंदर कासेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.)
एकूण वाहन किंमत: ₹४,९०,०००/-
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
पोलीस निरीक्षक सचिन हिरे, पो.उ.नि. अभिजीत बारांवळे, पोहवा अमित सावंत, संदीप चव्हाण, निलेश कांबळे, लिंबाजी शेडगे, समीर पवार, रामा मासाळ, किरण देवकते, प्रणित कळमकर, आकाश डोंगरे इत्यादींनी ही कौतुकास्पद कारवाई यशस्वीपणे पार पाडली.