ताज्या बातम्यारायगड

“साहित्यसेवेचा नवा अध्याय” – रमेश धनावडे यांची कोमसाप अलिबाग अध्यक्षपदी निवड


अलिबाग (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) अलिबाग तालुका शाखेच्या सर्वसाधारण सभेत रमेश प्रभाकर धनावडे यांची शाखाध्यक्षपदी एकमताने आणि बिनविरोध निवड करण्यात आली. पुढील तीन वर्षांसाठी कार्यरत राहणाऱ्या नवीन कार्यकारिणीची निवडही यावेळी करण्यात आली.

रमेश धनावडे हे यापूर्वी कोमसाप अलिबाग तालुका प्रतिनिधी आणि रायगड जिल्हा कार्यकारिणीवर सक्रियपणे कार्यरत होते. त्यांच्या अध्यक्षपदी निवडीनंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन आणि स्वागत केले.

सर्व सदस्यांची निवड बिनविरोध आणि एकमताने झाली. यानंतर नव्या कार्यकारिणीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष रमेश धनावडे यांनी सांगितले की, “कोमसाप अलिबाग शाखेचा साहित्यिक नावलौकिक पुढे नेत, संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत नेण्यासाठी प्रयत्नशील राहू.”

सभेच्या प्रारंभी माजी अध्यक्षा सुजाता पाटील यांनी प्रास्ताविक करत, मागील कार्यकारिणीच्या कार्याचा आढावा घेतला आणि सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. त्यानंतर नियुक्त निवडणूक अधिकारी निर्मला फुलगावकर आणि नंदू तळकर यांच्या देखरेखीखाली निवड प्रक्रिया सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.

नवनियुक्त कार्यकारिणी:

उपाध्यक्ष – किशोर म्हात्रे

जिल्हा प्रतिनिधी – नंदू तळकर

सचिव – वैशाली भिडे

सहसचिव – दिप्ती कुलकर्णी

खजिनदार – नागेश कुलकर्णी

युवाशक्ती प्रमुख – गायत्री तुळपुळे

कार्यकारिणी सदस्य:

वर्षा दिवेकर, रविंद्र थळे, ॲड. नीला तुळपुळे, वर्षा कुवळेकर, स्नेहल आंब्रे, सागर नार्वेकर

सल्लागार समिती:

निर्मला फुलगावकर, सुजाता पाटील, डॉ. चंद्रकांत वाजे, संध्या कुलकर्णी

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button