ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई
“साडीच्या लयीत, हँडलूमच्या रेशीम स्वप्नात — शाईना एनसीचा रंगोत्सव NGMAत”

मुंबई : ‘क्वीन ऑफ ड्रेप्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध डिझायनर शाईना एनसी यांच्या हँडलूम फॅशन शोचा विशेष प्रेस प्रिव्ह्यू येत्या 13 ऑगस्ट 2025 रोजी सायं. 4 वाजता राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय (NGMA), मुंबई येथे रंगणार आहे.
या खास शोमधून भारतीय हँडलूमची कालातीत सौंदर्यपरंपरा, हस्तकलेचा नाजूकपणा आणि सांस्कृतिक वारसा नव्या दमदार रूपात सादर केला जाणार आहे.
‘टिस्सर आर्टिझन ट्रस्ट’च्या सहकार्याने विशेष सक्षम व वंचित कलावंतांनी घडवलेल्या हँडलूम कलाकृतींचेही हृदयस्पर्शी प्रदर्शन यावेळी पाहायला मिळणार आहे. हा उपक्रम त्यांच्या कौशल्य, जिद्द आणि सर्जनशीलतेला सलाम करणारा ठरेल.
NGMA मुंबईच्या संचालिका निधी चौधरी यांनी या अद्वितीय फॅशन आणि कलाविश्वाच्या संगमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.