ताज्या बातम्यारायगड

सांबरकुंड धरण उभारणीस अखेर हिरवा कंदील; अलिबागच्या पाणीप्रश्नाला दिलासा


अलिबाग: अलिबाग तालुक्याच्या भविष्यातील पाणी गरजा भागवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या सांबरकुंड धरणाच्या उभारणीला अखेर वन विभागाकडून परवानगी मिळाली आहे. या निर्णयामुळे अलिबाग व परिसरातील दीर्घकाळचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटण्याची आशा निर्माण झाली आहे.

सांबरकुंड हे प्रस्तावित धरण १९८२ पासून प्रलंबित होते. धरणाचे काही भाग वन विभागाच्या क्षेत्रातून जात असल्यामुळे मंजुरी अडकली होती. मात्र, वन विभागाच्या दिल्ली मुख्यालयाने हिरवा कंदील दर्शवून धरणाच्या उभारणीस अधिकृत परवानगी दिली आहे.

या धरणाच्या माध्यमातून अलिबाग शहरासह आसपासच्या गावांना सातत्याने आणि सुरक्षित पाणीपुरवठा करता येणार आहे. २०१६ पासून सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर आता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

सांबरकुंड प्रकल्पाचा तपशील:

एकूण प्रकल्प खर्च: ₹१०३.६९ कोटी

पाणीयुक्त क्षेत्रफळ: ९३०.५५ हेक्टर

पाण्याचा साठा: ३८.७८ एमसीएफटी

 

२०८ कुटुंबांचे पुनर्वसन आवश्यक

सांबरकुंड धरणामुळे प्रभावित होणाऱ्या बावनगाव, आंबेगाव, सोनसई आदी गावांतील सुमारे २०८ कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. जलसंपदा विभागाने पुनर्वसनासाठीचा आराखडा तयार केला आहे.

“सांबरकुंड धरणाची उभारणी” हा अलिबागसाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर संपूर्ण तालुक्याचा पाणीप्रश्न कायमचा सुटण्याची शक्यता आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button