ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

समाजसेवेसाठी अँड. विश्वनाथ भगत यांचा गौरव – “महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५”


रायगड : जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील बोरपाडा येथील सुपुत्र, देवा ग्रुप फाऊंडेशन आरोग्य विभागाचे कोकण प्रदेश सचिव अँड. विश्वनाथ धर्मा भगत यांना युवा महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे “महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला. सिनेअभिनेत्री हर्षिता ठाकुर, डॉ. अविनाश सकुंडे (IHRAO), रवी अग्रवाल (अनुर्वी फाऊंडेशन) आणि गणेश विटकर (आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन) यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.

देवा ग्रुप फाऊंडेशन आरोग्य विभागाच्या माध्यमातून अँड. विश्वनाथ भगत यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मुंबईसह कोकणातील गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून अनेकांचे जीवन घडवण्याचे कार्य केले आहे. “सेवा हीच खरी प्रतिष्ठा” या तत्त्वावर आधारित त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

पुरस्कार सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या निःस्वार्थ कार्याची प्रशंसा केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आरोग्य, शिक्षण आणि न्याय सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या ध्येयाने संपूर्ण कोकणात सकारात्मक बदल घडवला आहे.


Related Articles

Back to top button