सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त पडसरे आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड-पाली : जयहिंद लोकचळवळीचे मार्गदर्शक आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्राचे युवा नेते सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त, सुधागड तालुक्यातील पडसरे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
आश्रमशाळेतील सुमारे ५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा लाभ यावेळी देण्यात आला. सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. आमदार तांबे हे महाराष्ट्रातील युवकांसाठी प्रेरणास्थान असून एक अभ्यासू आणि कर्तृत्ववान युवा नेता म्हणून ओळखले जातात.
वाटप कार्यक्रमासाठी जयहिंद लोकचळवळीचे कोकण संघटक ॲड. प्रथमेश पाटील, कार्यकारणी सदस्य संजोग शेठ, जिल्हा संघटक ॲड. कौस्तुभ पुनकर, हाशिवरे ग्रामपंचायतीचे सदस्य सागर पाटील व अंकुर मोकल यांच्यासह आश्रमशाळेतील शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




