भाजप दक्षिण रायगडची ‘पॉवर लिस्ट’ जाहीर; कोण कुठे जाणून घ्या!

रायगड : भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मान्यतेने ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. खासदार व दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या हस्ते 20 जुलै 2025 रोजी नियुक्तीपत्रे देण्यात आली.
या नव्या कार्यकारिणीत पक्षवाढीच्या दृष्टीने विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सरचिटणीस म्हणून सतीश धारप, अॅड. महेश मोहिते, वैकुंठ पाटील, प्रशांत शिंदे आणि हेमा माणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिटणीस पदावर सतीश लेले, विठ्ठल शिंदकर, गोविंद कासार, वासुदेव म्हात्रे, जोमा दरोडा, श्रीकांत पाटील, निलीमा भोसले, श्रद्धा घाग आणि वैशाली मापरा यांची निवड झाली आहे.
उपाध्यक्षपदी मिलिंद मोरेश्वर पाटील, मंगेश दळवी, सवाई पाटील, आलाप मेहता, सोपान जांभेकर, जयवंत दळवी, भालचंद्र महाले, मंजूषा कुद्रीमोती, श्रेया कुंठे आणि रश्मी वाजे यांची निवड झाली आहे.
कार्यक्षम कार्यकारिणी सदस्य म्हणून मारुती देवरे, बंडु खंडागळे, अक्षय ताडफळे, बळीराम जाधव, शोमेर पेणकर, डॉ. अजय जोगळेकर, चंद्रकांत होजगे, नरेंद्र पाटील, नरेंद्र खाडे, रमेश साळुंके, प्राजक्ता शुक्ला, जान्हवी आंजार, शोभा जोशी, वंदना म्हात्रे, दत्तात्रय पाटील, राजेंद्र धुमाळ, योगेश झिंजे, संदेश पालकर, संजय ढवळे, स्वप्निल म्हात्रे, सुशील शर्मा, तुकाराम पाटील, अॅड. शुभाष पाटील, सचिन करडे, अमोल घोटणे, शांता भावे, राजेंद्र गोळे, चिन्मय मोने, अॅड. दिव्या रातवडकर, कौस्तुभ भिडे, हाजी कोठारी, अनंता वाघ, उत्तम देशमुख आणि महादेव मोहिते यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या नव्या कार्यकारिणीमुळे दक्षिण रायगड जिल्ह्यात भाजप संघटन अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.