ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

“संत नामदेवांनी मानवतेचा मार्ग दाखविला”- उपमुख्यमंत्री शिंदे घुमानमध्ये महाराष्ट्र सदनाचे भूमिपूजन; संत नामदेव महाराज सन्मान पुरस्काराने गौरव


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

पंजाब-घुमान, ता. 3 :
संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 755 व्या प्रकाशोत्सवानिमित्त पंजाबमधील घुमान येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून मानवतेचा, एकात्मतेचा आणि विनम्रतेचा संदेश दिला. या प्रसंगी त्यांना ‘संत नामदेव महाराज सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याच वेळी महाराष्ट्र सदनाच्या भूमिपूजनाचाही सोहळा पार पडला. सदरचा कार्यक्रम रविवारी पार पडला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले,
“संत नामदेव महाराजांनी जात-धर्माच्या भिंती ओलांडून प्रेम, करुणा व समानतेचा मार्ग दाखविला. आज सकाळी पंढरपूरातील विठ्ठलाचे दर्शन आणि संध्याकाळी घुमानमध्ये बाबाजींचे दर्शन हे माझ्यासाठी अलौकिक आहे. जनतेच्या प्रेमाचा आणि संत परंपरेच्या आशीर्वादाचा हा सन्मान माझ्यासाठी विशेष आहे.”

ते पुढे म्हणाले,
“महाराष्ट्राच्या शिवरायांची आणि पंजाबच्या गुरु गोविंदसिंहजींची भूमी ही संतांची व शूरांची आहे. दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक नाते अधिक दृढ आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 1984 मध्ये सिख बांधवांच्या सुरक्षेसाठी भूमिका घेतली होती; तो बंध आजही कायम आहे. कार्यकर्ता असो वा मुख्यमंत्री — सेवा हेच माझे कर्तव्य.”

घुमानमध्ये उभारल्या जाणाऱ्या महाराष्ट्र सदनाबाबत शिंदे यांनी सांगितले की,
“घुमानचे नाव देश-विदेशात उजळावे यासाठी पायाभूत सुविधा, रस्ते यांची कामे जलद पूर्ण करण्यात येतील.” पंजाब सरकारने या प्रकल्पासाठी दिलेल्या दोन एकर जमिनीबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.


Related Articles

Back to top button