“श्रद्धेच्या रथावरून भगवंताच्या द्वारी — रायगडातून तिर्थयात्रेला भक्तिभावाने सुरुवात”
"धर्मपथावर भक्तिरथाची गंगा — भगव्या उत्साहात"

रायगड : शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी व रसिका केणी यांच्या संयुक्त आयोजनातून एक भव्य तिर्थक्षेत्र दर्शन सहल नुकतीच आयोजित करण्यात आली. या पवित्र यात्रेला तब्बल ४७ बसेसने प्रवाशांनी भगव्या झेंड्याखाली जय शिवराय आणि हर हर महादेवच्या जयघोषात उत्साहपूर्ण सुरवात केली.
या यात्रेचा प्रारंभ खास राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. सकाळी यात्रेच्या शुभारंभप्रसंगी दिलीप उर्फ छोटम भोईर यांच्यासह विविध पदाधिकारी, शिवसैनिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेपूर्वी सर्व बसगाड्यांना विधिवत पूजन करून नारळ फोडून प्रस्थान करण्यात आले.
ही तिर्थदर्शन यात्रा महाराष्ट्र व सीमाभागातील विविध पवित्र स्थळांना भेट देणार असून, यात्रेकरूंना अध्यात्मिक समाधान आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ठरणार आहे. यात्रेची योग्य व्यवस्था, प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी आणि धार्मिक वातावरण तयार करण्यासाठी संपूर्ण टीम सक्रिय आहे.
या उपक्रमामुळे शिवसेना रायगड जिल्ह्याच्या कार्यपद्धतीत धार्मिक व सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. राजा केणी यांच्या सामाजिक आणि धार्मिक भान असलेल्या नेतृत्वाचे अनेकांनी कौतुक केले.