ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शिक्षकांच्या पेन्शन योजनेत बदलाचा निर्णय जवळपास अंतिम टप्प्यात!
उद्योग मंत्री उदय सामंत यांची विधानपरिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील शिक्षकांच्या निवृत्ती वेतन योजनेत (पेन्शन स्कीम) सुधारणा करण्याबाबत राज्य सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य सुधाकर अडबाले यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली असता, सामंत म्हणाले की,
> “२०१५ पासून अंशदान निवृत्ती वेतन योजना केंद्र सरकारच्या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे. आता शिक्षकांना त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया अर्थ विभागाच्या विचाराधीन आहे, आणि यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.”
तसेच, महानगरपालिका आणि नगरपालिकांतील शिक्षकांनाही शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच निवृत्ती लाभ मिळावेत यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण मंत्र्यांसमवेत विशेष बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
—
✅ ठळक मुद्दे :
शिक्षक निवृत्ती वेतन योजनांबाबत सकारात्मक हालचाल
अर्थ विभागात फायनल निर्णय प्रक्रियेत
महापालिका शिक्षकांना समान लाभ देण्याबाबत स्वतंत्र बैठक
केंद्र सरकारच्या योजनेशी समन्वय