ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

“प्रेरणादायी कार्याची दखल” – अॅड. अजय उपाध्ये यांना क्रांतीसूर्य समाजरत्न कार्यगौरव पुरस्कार २०२५


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

शिर्डी (अहिल्यानगर) : क्रांतीसूर्य शेती व शिक्षण विकास संस्था, महाराष्ट्र राज्य आयोजित क्रांतीसूर्य कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२५ शिर्डी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजासाठी आदर्श ठरलेल्या मान्यवरांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात अलिबागचे निष्णांत कायदेतज्ञ मा. अॅड. अजय यशवंत उपाध्ये यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल क्रांतीसूर्य समाजरत्न कार्यगौरव पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. संस्थेच्यावतीने प्रदान करण्यात आलेल्या या सन्मानपत्रातून उपाध्ये यांच्या सामाजिक कार्याचा मनःपूर्वक गौरव करण्यात आला.
“कष्ट, परिश्रम, प्रामाणिकपणाच्या जोरावर यशाचे शिखर गाठणाऱ्या आणि समाजाला नवी दिशा दाखवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान म्हणजे हा पुरस्कार होय. अॅड. उपाध्ये यांच्या कार्यामुळे समाजात नवा प्रकाश निर्माण झाला असून त्यांचा आदर्श इतरांना प्रेरणादायी ठरेल,” असे संस्थेच्यावतीने नमूद करण्यात आले.
या सोहळ्याला लोकनेते बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, डॉ. सुधीरजी तांबे, सत्यजित तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन खंबू आप्पा सातपुते (अध्यक्ष) व प्रा. गोरेश चांगदेव भवर (सचिव) यांनी केले. शिर्डी येथील हॉटेल साई संगम, वॉटर पार्क सभागृहात हा सोहळा पार पडला.
अॅड. अजय यशवंत उपाध्ये यांना मिळालेला हा क्रांतीसूर्य समानरत्न कार्यगौरव पुरस्कार केवळ त्यांचा व्यक्तिगत सन्मान नसून, संपूर्ण समाजाचा गौरव असल्याचे उपस्थित मान्यवरांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button