“विद्यार्थी विकास व सामाजिक प्रगतीसाठी मुख्य सचिव विकास खारगे यांची अलिबाग भेट”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महत्त्वपूर्ण आहेत. शिक्षणासोबतच मुलांच्या संस्कार व मूल्यवर्धनासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. यासाठी जिल्ह्यातील अधिकारी वर्षातून किमान दोनदा शाळा भेट देऊन “प्रेरणा दिवस” साजरा करतील.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत आज अलिबाग तालुक्यातील पी.एम. श्री. रा. जिल्हा परिषद शाळा, नवगाव येथे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी मार्गदर्शन केले.
यावेळी बोरिस व गुंजीस येथील पाणंद रस्त्यांची पाहणी केली, ग्रामपंचायत गुंजीस येथे आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले, तसेच नवगाव आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा व तहसील कार्यालयाची देखील पाहणी करण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनिल इंदलकर, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, तसेच मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.




