ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
लालबावटा उतरला, कमळ कोमेजले अलिबागमध्ये एकहाती भगवा! आमदार महेंद्र दळवी यांची रणनीती आली फळाला
राष्ट्रवादी काँग्रेसने खाते उघडले, अमित नाईक यांनी केला शेकाप, शिवसेना,भाजपाच्या उमेदवारांचा दारूण पराभव

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदारांनी अक्षरशः राजकीय गणिते उलथवून टाकत एकतर्फी कौल दिला आहे. तब्बल सातपैकी सहा जिल्हा परिषद मतदारसंघांवर शिवसेना (शिंदे गट)ने भगवा फडकवत इतर सर्व पक्षांचा साफ सुपडा साफ केला. उरलेल्या एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली असली तरी तालुक्यातील खऱ्या अर्थाने सत्तेचा गड एकाच पक्षाने काबीज केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
शेतकरी कामगार पक्षाला एकही जागा मिळाली नाही. वर्षानुवर्षे “लालबावटा” दाखवत सत्ता मिरवणाऱ्या शेकापचा तालुक्यात अक्षरशः नामोनिशान पुसल्याचे चित्र दिसले. भाजप, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचीही अवस्था फार वेगळी राहिली नाही लढले मात्र मतदारांनी थेट नाकारले.
पंचायत समितीत तर पूर्ण एकतर्फी कौल
१४ पैकी तब्बल १२ गणांवर शिवसेनेने विजय मिळवत विरोधकांना धुळ चारली. भाजप आणि शेकापला प्रत्येकी फक्त एक जागा म्हणजे तालुक्यातील संघटनात्मक बळाचा फुगा फुटल्याचे निकालातून स्पष्ट झाले.

अलिबाग येथील नेहुली क्रीडा संकुलात सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होताच चित्र स्पष्ट होत गेले. चोख पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या मतमोजणीत प्रत्येक फेरीगणिक विरोधकांचे चेहरे उतरले आणि भगव्याची आघाडी वाढत गेली. दुपारपर्यंतच “कोण जिंकणार?” हा प्रश्न संपून “किती मोठ्या फरकाने जिंकणार?” हा प्रश्न उरला.

या निकालाने अलिबाग तालुक्यातील पारंपरिक राजकारण मोडीत निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. शेकापचा गड कोसळला, काँग्रेस-राष्ट्रवादीची पकड सुटली, भाजपचे संघटन दिसले नाही आणि उबाठा गट मतदारांपर्यंत पोहोचलाच नाही — असा सूर मतदारांमध्ये ऐकायला मिळत आहे.
तालुक्यात आता विरोधकांसमोर प्रश्न एकच — मतदारांनी नाकारले ते का?

जिल्हा परिषद निकाल (सविस्तर)
शहापूर
अमित नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस) – 8908 (विजयी)
गिरीश पाटील (शिवसेना शिंदे) – 5884
अभिषेक पाटील (शेकाप) – 4293
सवाई पाटील (भाजप) – 2547
आंबेपूर
रसिका केणी (शिवसेना) – 11,974 (विजयी)
चित्रा पाटील (भाजप) – 7,459
पूजा भगत (शेकाप) – 4,785
आवास
दिलीप भोईर (शिवसेना) – 11,933 (विजयी)
राजा ठाकूर (काँग्रेस) – 9,561
थळ
मानसी दळवी (शिवसेना) – 14,328 (विजयी)
सानिका घरत (शेकाप) – 7,859
चेंढरे
आदिती दळवी-नाईक (शिवसेना) – 11,313 (विजयी)
प्रवीणा घासे (शेकाप) – 6,258
चौल
सचिन राऊळ (शिवसेना) – 10,223 (विजयी)
सुरेंद्र म्हात्रे (शिवसेना उ.बा.ठा) – 6,456
संकेत जोशी (भाजप) – 1,546
कावीर
अनंत गोंधळी (शिवसेना) – 9699 (विजयी)
मोहन धुमाळ (शेकाप) – 9545
श्रीधर भोपी (राष्ट्रवादी काँग्रेस) – 4,937
…….

पंचायत समिती निकाल (सविस्तर)
वैजाळी
प्रकाश पाटील (शिवसेना) – 3376 (विजयी)
मच्छिंद्र पाटील (राष्ट्रवादी) – 3351
जगन्नाथ म्हात्रे (भाजप) – 1282
सुशील सखाराम पाटील (शेकाप) – 2765
शहापूर
भाग्यता नंदन पाटील (शिवसेना) – 3820 (विजयी)
वैभव पाटील (राष्ट्रवादी) – 2586
कौशिक पाटील (शेकाप) – 2479
राजेंद्र पाटील (भाजप) – 1845
आंबेपूर
शैलेंद्र पाटील (शिवसेना) – 4729 (विजयी)
धनंजय म्हात्रे (शेकाप) – 3721
सतीश तरे (भाजप) – 3307
रुईशेत भोमोली
कृष्णा लोभी (शिवसेना) – 7052 (विजयी)
कृष्णा उघडा (शेकाप) – 2735
जनार्दन मेंगाळ (भाजप) – 2465
आवास
प्रिया भगत (शिवसेना) – 5476 (विजयी)
नयना शिळदणकर (शेकाप) – 4175
किहीम
स्नेहा संतोष रूत (शिवसेना) – 6251 (विजयी)
अनिता शिंदे (काँग्रेस) – 5461
थळ
वैशाली कटवटे (शिवसेना) – 6713 (विजयी)
श्वेताली थळकर (शेकाप) – 3351
वरसोली
प्रियंका गुंजाळ (शिवसेना) – 7194 (विजयी)
वैशाली पाटील (शेकाप) – 5400
चेंढरे
प्रियदर्शनी पाटील (भाजप) – 2931 (विजयी)
प्रिया ढवळे (शेकाप) – 2811
ॲड. मृणाल पाटील (शिवसेना) – 2626
आक्षी
जयंत वार्डे (शिवसेना) – 4348 (विजयी)
प्रफुल्ल पाटील (शेकाप) – 3170
महेश गुरव (उ.बा.ठा) – 708
रेवदंडा
शरद गोंधळी (शिवसेना) – 3827 (विजयी)
राकेश म्हात्रे (शेकाप) – 3588
उदय काठे (भाजप) – 2359
चौल
अंकिता घरत (शिवसेना) – 3300 (विजयी)
अनया फुंडे (शेकाप) – 3168
अर्चना घरत (भाजप) – 1867
कावीर
संतोष निगडे (शिवसेना) – 4750 (विजयी)
निलेश गायकर (भाजप) – 4085
अनिल पाटील (शेकाप) – 3838
रामराज
अंजली पाटील (शेकाप) – 5910 (विजयी)
तृषा भगत (शिवसेना) – 5358
…..




