राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई : राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोमवारी सकाळी जाहीर करण्यात आले. त्यामध्ये राज्यातील 33 नगरपरिषद अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. त्यापैकी 17 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले, तर 67 नगरपरिषदा ओबीसीसाठी राखीव आहेत, त्यापैकी 34 नगरपरिषदांवर ओबीसी महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिना संपण्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर प्रशासन वेगाने तयारीला लागले आहे. 6 ऑक्टोबर मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृह येथे मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल याची लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड उत्सुकता होती.
आता जाहीर झालेल्या आरक्षणामुळे कोणत्या राजकीय पक्षाला फायदा किंवा तोटा होईल, हे काही वेळातच समोर येणार आहे.
—
स्थानिक समीकरणे बदलणार
या आरक्षणामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय पक्षांना उमेदवार निवड आणि प्रचाराची रणनीती नव्याने आखावी लागणार आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या महिलांसाठी राखीव जागांमुळे काही पक्षांना फायदा होऊ शकतो, तर काहींना आपली रणनीती बदलावी लागेल. येत्या काही महिन्यात निवडणूक प्रक्रियेतून कोणत्या पक्षाला यश मिळेल, हे स्पष्ट होईल.
—
महिलांना नेतृत्वाची संधी
हा निर्णय सामाजिक समावेशकतेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या महिलांना स्थानिक प्रशासनात नेतृत्वाची संधी मिळणार असून, यामुळे स्थानिक राजकारणात नवे बदल घडतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया गतिमान झाली असून, लवकरच निवडणुकीच्या तारखा आणि इतर तपशील जाहीर होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री मिसाळ यांनी दिली.
—
खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव 68 नगरपरिषदा

परळी वैजनाथ, मुखेड, अंबरनाथ, अचलपूर, मुदखेड, पवनी, कन्नड, मलकापूर-कोल्हापूर, मोवाड, पंढरपूर, खामगाव, गंगाखेड, धरणगाव, बार्शी, अंबड, गेवराई, म्हसवड, गडचिरोली, भंडारा, उरण, बुलढाणा, पैठण, कारंजा, नांदूरा, सावनेर, मंगळवेढा, कलमनूरी, आर्वी, किनवट, कागल, संगमनेर, मुरगुड, साकोली, कुरुंदवाड, पूर्णा, कळंब, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, भूम, रत्नागिरी, रहिमतपूर, खेड, करमाळा, वसमत, हिंगणघाट, रावेर, जामनेर, पलुस, यावल, सावंतवाडी, जव्हार, तासगाव, राजापूर, सिंदी रेल्वे, जामखेड, चाकण, शेवगाव, लोणार, हदगाव, पन्हाळा, धर्माबाद, उमरखेड, मानवत, पाचोरा, पेण, फैजपूर, उदगीर, अलिबाग.
—
नगरपंचायतींसाठी सर्वसाधारण महिलांचे आरक्षण (३७ जागा)
मोहाडी, बार्शी टाकळी, वाशी, नाडगाव, गुहागर, राळेगाव, लाखादूर, वैराग, सोयगाव, महादूला, अनगर, कडेगाव, पेठ, पाटण, औंढा नागनाथ, लाखणी, रेणापूर, नातेपुते, महसला, सडक अर्जुनी, दिडोरी, जळकोट, मेढा, लोणंद, वाडा, देवरुख, लांजा, शिंदखेडा, मंडणगड, तिवसा, वडगाव मावळ, पारशिवणी, शहापूर, देहू, कुही, मुक्ताईनगर, बाभुळगाव.
—
अनुसूचित जाती (SC) महिलांसाठी आरक्षण
देऊळगावराजा, मोहोळ, तेल्हारा, ओझर, वानडोंगरी, भुसावळ, घुग्गूस, चिमूर, शिर्डी, सावदा, मैनदर्गी, दिगडोहदेवी, दिग्रस, अकलूज, बीड, शिरोळ.
—
ओबीसी (OBC) महिलांसाठी आरक्षण
भगूर, इगतपुरी, विटा, बल्हारपूर, धाराशिव, भोकरदन, जुन्नर, उमरेड, दौंड, कुळगाव-बदलापूर, हिंगोली, फुलगाव, मुरुड-जंजीरा, शिरूर, काटोल, माजलगाव, मूल, मालवण, देसाईगंज, हिवरखेड, अकोट, मोर्शी, नेर-नवाबपूर, औसा, कर्जत, देगलूर, चोपडा, सटाणा, दोंडाईचा वरवडे, बाळापूर, रोहा, कुरडुवादी, धामणगाव रेल्वे, वरोरा.
—
नगरपंचायतीसाठी मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण
पारनेर, तळा, घनसावंगी, भामरागड, माळशिरस, आष्टी बीड, एटापल्ली, झरी जामणी, मंचर, पाटोदा, खानापूर, माढा, पोंभुर्णा, माहूर, वडवणी, पोलादपूर, आटपाडी, खालापूर, मालेगाव जहांगीर, शिरूर अनंतपाळ, पालम, कळवण, मंठा, सावली, कोंढाळी, मानोरा, मारेगाव, माळशिरस, आष्टी (वर्धा), एटापल्ली, झरी-जामणी, तलासरी, जाफ्राबाद, चाकूर, तीर्थपुरी, कणकवली, शिरूर कासार, आष्टी (बीड), विक्रमगड, अकोले, जिवती, मोखाडा, कर्जत-अहिल्यानगर, सुरगाना.
—
ओबीसी राखीव महिला नगरपंचायती
पोलादपूर, तलासरी, आष्टी (बीड), वडवणी, कळवण, घनसावंगी, सावली, कर्जत-अहिल्यानगर, माळेगाव, पाटोदा, खालापूर, मंचर, भामरागड, शिरूर अनंतपाळ, माढा, आष्टी वर्धा, जाफराबाद, चाकूर, मानोरा, जिवती.
—
खुल्या प्रवर्गासाठी महिला नगरपंचायती
मोहडी, बार्शी टाकळी, वाशी, म्हाळुंगा श्रीपूर, नांदगाव खंडेश्वर, गुहागर, राळेगाव, लाखांदूर, वैराग, सोयगाव, महादूला, अनगर, कडेगाव, पेठ, पाठण, औंढा नागनाथ, लाखनी, रेणापूर, नातेपुते, म्हसळा, सडक अर्जुनी, दिंडोरी, जळकोट, मेढा, लोणंद, वाडा, देवरुख, लांजा, शिंदखेडा, मंडणगड, तिवसा, वडगाव मावळ, पारशिवणी, शहापूर, देहू, कुही, मुक्ताईनगर, बाभुळगाव.




