ताज्या बातम्या

मिठेखार येथे घरावर कोसळली दरड – वृद्ध महिलेचा मृत्यू


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

रायगड  : जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून नद्या, उपनद्या व ओढ्यांना पूर आला आहे. याच पावसाचा फटका मुरुड तालुक्यातील मिठेखार गावाला बसला आहे. गावातील एका घरावर सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली.

या घटनेत श्रीमती विठा मोतीराम गायकर (वय 75, रा. मिठेखार मंडळ बोर्ली, ता. मुरुड, जि. रायगड) यांचा मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच मुरुडचे तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासनाने बचावकार्य सुरू केले असून दरडग्रस्त परिसरातील इतर घरांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.


Related Articles

Back to top button