ताज्या बातम्यारायगड
मांडव्यात पोलिसांची धडक कारवाई; १.१७ लाखांची विदेशी दारू जप्त

रायगड : गुप्त माहितीच्या आधारे मांडवा सागरी पोलिसांनी दुसरी नाका परिसरात छापा टाकत परराज्यातून आणलेला परराज्य दारूचा मोठा साठा जप्त केला. या प्रकरणी प्रकाश प्रेमनाथ जायसवाल (वय 33, रा. दुसरी वाटा, मांडवा, मूळ रा. पटना, बिहार) याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई १३ ऑगस्ट रोजी पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपनिरीक्षक सज्जन वाणी यांच्या पथकाने पार पाडली. आरोपीकडून एकूण ९२१ दारूच्या बाटल्या, किंमत अंदाजे ₹१,१७,१८०, जप्त करण्यात आल्या आहेत. यात मॅकडॉवल, रॉयल ग्रीन, डिलक्स ब्लॅक, ओकस्मिथ गोल्ड, ब्लॅक अँड व्हाईट, अॅबसोल्यूट व्होडका, जॉनी वॉकर, टीचर्स यांसह विविध ब्रँडची विदेशी दारू समाविष्ट आहे.
गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुसरी नाका येथे तपास केला असता आरोपी संशयास्पद हालचाली करताना दिसला. त्याच्या ताब्यातील पत्र्याच्या शेडमधून दारूच्या बाटल्या सापडल्या. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.