ताज्या बातम्यारायगड

“‘महसूल सप्ताह’… सेवाभावी प्रशासनाचा नवा अध्याय”

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे प्रतिपादन


रायगड : “महसूल विभाग हा शासनाचा कणा असून, या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख कामगिरी करण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महसूल दिनाच्या कार्यक्रमात केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या सोहळ्याला रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे आदी उपस्थित होते.
“महसूल विभाग जनतेच्या संपर्कात असलेला विभाग” – तटकरे
मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की, शासनाचे विविध उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे. “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” यासारख्या उपक्रमांतून सरकारी सेवा जनतेच्या दारी नेण्यासाठी प्रयत्न होत आहेत. सर्व कार्यालयांत आवश्यक साधनसामुग्री असली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोगावले यांचेही प्रशासनाला सूचक मार्गदर्शन
मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की, “शासन हे गोरगरीबांचे आहे. त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.” महसूल विभागाने जनहिताचे निर्णय वेळेत घेऊन जनतेचा विश्वास जिंकावा, असेही ते म्हणाले.
महसूल सप्ताहाचे आयोजन
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले की, १ ते ७ ऑगस्ट दरम्यान ‘महसूल सप्ताह’ साजरा केला जाणार असून विविध शासकीय योजना, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, तसेच जनजागृती मोहिमा राबवण्यात येणार आहेत.
उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव
स्वामित्व योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सनद वाटप करण्यात आली. महसूल विभागातील उत्कृष्ट तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, शिपाई, वाहनचालक आणि सहाय्यक अधिकारी यांचा सत्कार झाला. या सत्काराने कार्यरत कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले.
दरम्यान, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी आभार मानले.
………

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button