ताज्या बातम्यारायगड

“महसूलात नवचैतन्याचा आठवडा : १ ते ७ ऑगस्ट दरम्यान उपक्रमांची मांदियाळी”

जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती


रायगड : राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ७ ऑगस्टपर्यंत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महसूल दिनाच्या (१ ऑगस्ट) निमित्ताने सुरू होणाऱ्या या सप्ताहात महसूल विभागातील निवृत्त व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार, विविध प्रमाणपत्रांचे वाटप, नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ, वाद निवारण आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.

महसूल सप्ताहातील दिननुसार उपक्रम

१ ऑगस्ट – महसूल दिन: निवृत्त व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव व विविध प्रमाणपत्रांचे वाटप.

२ ऑगस्ट – अतिक्रमण नियमबद्ध: ३१ डिसेंबर २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर राहणाऱ्या पात्रांना पट्टे वाटप.

३ ऑगस्ट – शेत रस्त्यांचे वाद निवारण: पाणंद व शिवपांदण रस्त्यांचे वाद निकाली काढून १२ फूट रस्त्यांचे नियोजन.

४ ऑगस्ट – महाराजस्व अभियान: प्रमाणपत्र वाटप व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी मंडळ स्तरावर शिबिर.

५ ऑगस्ट – DBT अडचणी निवारण: लाभार्थ्यांना घरी जाऊन तलाठ्यांकडून आधार लिंकिंग आणि DBT प्रक्रियेची पूर्तता.

६ ऑगस्ट – शर्तभंग कारवाई: अटींचे उल्लंघन करणाऱ्या शासकीय जमिनींचे सर्वेक्षण व पुनःप्राप्ती.

७ ऑगस्ट – एम-सँड धोरण आणि समारोप: कृत्रिम वाळू धोरणावर कार्यशाळा व SOP मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी; महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ.

या आठवड्याच्या उपक्रमांद्वारे महसूल प्रशासन अधिक प्रभावी व पारदर्शक बनवण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button