ताज्या बातम्यामुंबईरायगड

“मधुमेहावर मात शक्य! – व्यायाम, योग्य आहार आणि शांत मनच रामबाण”-डॉ. भाग्येश कुलकर्णी

कमळ नागरी पतसंस्थेच्या वतीने आरोग्यप्रबोधन कार्यक्रम; तणावमुक्त जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन


अलिबाग : व्यायामाची सवय, आहारात योग्य बदल आणि तणावमुक्त जीवनशैलीचा अवलंब केल्यास मधुमेहावर हमखास मात करता येते, असा सल्ला ‘डायबेटीस फ्री फॉरेव्हर’चे संचालक व डायबेटीस रिव्हर्सल स्पेशलिस्ट डॉ. भाग्येश कुलकर्णी यांनी दिला.

रविवार, १० ऑगस्ट रोजी ‘मधुमेह मुक्त जीवन कसे ते जाणून घेऊ’ या कार्यक्रमाचे आयोजन कमळ नागरी पतसंस्थेच्या सहकार्याने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ. अरविंद केळकर यांच्या प्रयत्नांसह पतसंस्थेच्या अध्यक्ष नंदकुमार चाळके आणि संचालक मंडळाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमात डॉ. संजीव शेटकर, डॉ. अमेय केळकर, विलास म्हात्रे, डॉ. अरविंद केळकर, डॉ. अपुर्वा कुमठेकर आणि डॉ. अवनी केळकर यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. कुलकर्णींचे मार्गदर्शन

डॉ. कुलकर्णी यांनी मधुमेह नियंत्रण आणि मुक्तीसाठी महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या –

कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करणे आणि प्रोटीन-व्हिटॅमिन वाढवणे

दररोज ४५ मिनिटे व्यायाम, सूर्यनमस्कार आणि घाम येईल इतकी हालचाल

व्यायामानंतर दीड तास काही न खाणे

मोड आलेले कडधान्य, वेळेवर झोप, ध्यानधारणा आणि तणावमुक्त जीवन

सकारात्मक विचार, कृतज्ञता आणि शांत मन

त्यांनी सांगितले की अमेरिकन डायबेटीस असोसिएशननुसार एचबीए१सी ७-८च्या आत असेल तर औषधांशिवाय व्यवस्थापन शक्य आहे. आतापर्यंत १६ हजार लोकांना मधुमेहमुक्त करण्यात त्यांनी यश मिळवले आहे. अलिबागमध्ये लवकरच डायबेटीस मुक्त केंद्र सुरू करण्याचीही त्यांनी घोषणा केली.

डॉ. अरविंद केळकर यांचे मनोगत

पूर्वी मधुमेह ५०-६० वयानंतर दिसायचा, पण आता ३०च्या आतही रुग्ण वाढले आहेत. बैठी जीवनशैली, बाहेरचे अन्न, ताणतणाव आणि वाढलेला खर्च ही मुख्य कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. आभार प्रदर्शन दिलीप पाटील यांनी केले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.

……..

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button