ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
मतदानाआधीच धक्का! नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुका अचानक स्थगित — फडणवीस आक्रमक भूमिकेत
कोकणातील एका नगरपरिषदेचा समावेश

—
ब्रेकिंग न्यूज
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई : उद्या म्हणजे २ डिसेंबरला मतदान होणार असताना, राज्यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका अचानक स्थगित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. कायदेशीर पेच व तांत्रिक अडचणींचा दाखला देत हा निर्णय घेण्यात आला. मात्र शेवटच्या क्षणी घेतलेल्या या निर्णयाने उमेदवार, पक्ष आणि जनतेत नाराजी पसरली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले — “इतिहासात पहिलाच प्रकार!”
या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. “निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. एका उमेदवाराने कोर्टात गेलं म्हणून संपूर्ण निवडणूक पुढे ढकलणं हा इतिहासात कधीच झालेला प्रकार नाही.”
फडणवीस यांनी पुढे म्हटले, “स्वतंत्र संस्थेचा आम्ही आदर करतो, परंतु उद्या मतदान असताना आज निवडणुका स्थगित करणे हा उमेदवारांवर अन्यायकारक आहे.”
“उमेदवारांची मेहनत वाया”
मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन, “महिनाभर प्रचार केला, पैसा, मनुष्यबळ, वेळ खर्च झाली. आता पुन्हा १५–२० दिवस प्रचार? हे योग्य नाही.” सरकार आयोगाकडे अधिकृत Representation देऊन हा निर्णय पुन्हा विचारात घेण्याची मागणी करणार आहे.
—
स्थगित झालेल्या निवडणुका — विभागनिहाय यादी
अमरावती विभाग
बाळापूर
अंजनगाव सुर्जी
यवतमाळ
देऊळगाव राजा
वाशिम
कोकण विभाग
अंबरनाथ
छत्रपती संभाजीनगर विभाग
फुलंब्री
धर्माबाद
मुखेड
रेणापूर
वसमत
नागपूर विभाग
घुग्घूस
देवळी
नाशिक विभाग
देवळाली-प्रवरा
कोपरगाव
पाथर्डी
नेवासा
पुणे विभाग
बारामती
फुरसुंगी-उरळी देवाची
महाबळेश्वर
फलटण
मंगळवेढा
अणगर
नगराध्यक्षपदाचा आढावा
स्थिती आकडे
घोषणा – 288
बिनविरोध निवड – 3
निवडणुका स्थगित – 22
उद्या मतदान – 253
—–
पुढील प्रश्न कायम:
हा निर्णय प्रशासनिक की राजकीय?
आयोगाच्या निर्णयामागे दबाव होता का?
उमेदवारांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कशी?
राज्यात याच मुद्द्यावर आता राजकीय तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.
—



