ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

प्रामाणिक सेवेला सलाम : एलआयसी व CLIA कडून बाबुलाल जैन यांचा २५ वर्षांच्या योगदानासाठी गौरव


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग :  विमा क्षेत्रात गेली पंचवीस वर्षे सातत्याने, प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्यरत असलेल्या बाबुलाल जैन यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. ग्राहकसेवेत उल्लेखनीय ठसा उमटवणाऱ्या त्यांच्या कार्याचा गौरव ठाणे विभागातील CLIA मॅनेजर गणेश घग तसेच भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) रोहा शाखेचे अधिकारी हरिश्चंद्र बिरारी यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमात बाबुलाल जैन यांच्या दीर्घ सेवाकाळातील योगदानाचा आढावा घेण्यात आला. विमा क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून सामाजिक सुरक्षिततेचे महत्त्वाचे माध्यम असल्याचे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. ग्रामीण व शहरी भागातील अनेक कुटुंबांना विमा संरक्षण मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली असून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
सत्कारप्रसंगी बोलताना गणेश घग यांनी बाबुलाल जैन यांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक केले. ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हीच खरी विमा सेवा असून जैन यांनी ती प्रामाणिकपणे जपली, असे ते म्हणाले. यावेळी एलआयसीच्या रोहा शाखा अधिकाऱ्यांनीही त्यांच्या सेवाभावाची दखल घेत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना बाबुलाल जैन यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय, सहकारी, एलआयसीचे अधिकारी तसेच विश्वास ठेवणाऱ्या ग्राहकांना दिले. भविष्यातही विमा क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा देत अधिकाधिक लोकांपर्यंत विम्याचे महत्त्व पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला विमा क्षेत्रातील सहकारी, हितचिंतक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button