ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“प्राण्यांचा खरा जिवलग! शैलेश चव्हाण यांचा ‘प्राणी मित्र पुरस्काराने सन्मान”
भवानी नागरी सहकारी पतसंस्थेचे विशेष सभा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : “प्राण्यांवाचून जगाची कल्पनाच करता येणार नाही. त्यांचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे” या भावनेला मूर्त रूप देणारे शिवसेना उपाध्यक्ष शैलेश चव्हाण यांचा जय भवानी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने ‘प्राणी मित्र पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
पतसंस्थेची 33 वी सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. त्या विशेष प्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. मिलिंद चव्हाण यांच्या हस्ते शैलेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
शैलेश चव्हाण यांनी गेल्या काही वर्षांत अलिबाग परिसरात अनेक जखमी, आजारी व भटक्या प्राण्यांची काळजी घेतली, त्यांना वैद्यकीय मदत, आसरा आणि अन्न उपलब्ध करून दिले. त्यांच्या या जिव्हाळ्याच्या कार्याची दखल घेत ‘प्राणी मित्र पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.
या सत्कारावेळी संस्थेचे पदाधिकारी, सभासद व स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी शैलेश चव्हाण म्हणाले, “प्राण्यांवरचे प्रेम ही केवळ भावना नसून ती आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यांचं रक्षण केलं तरच आपली मानवता जपली जाईल.”