“प्रदूषण थांबवा… नाहीतर रायगड उद्ध्वस्त होईल!” – शेकाप

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : प्रदूषण वाढलं तर रायगडचं पर्यावरण नष्ट होईल, पर्यटन संपेल, पुढची पिढी जन्मालाही येऊ शकणार नाही, या विनाशाला आम्ही कधीही मान्यता देणार नाही, प्रकल्प हवेत पण प्रदूषणावर तडजोड नाही, JSW कंपनीने लोकांचा मालक बनू नये राज्य लोकांचे आहे कंपनीचे नाही असा इशारा शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी दिला.
100 टक्के स्थानिकांना कायमस्वरूपी नोकरी द्या अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील, लिखित कराराशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, कंपनीचे हॉस्पिटल सर्वांसाठी माफक दरात आणि प्रदूषण झोनमधील नागरिकांसाठी पूर्णतः मोफत असलेच पाहिजे अन्यथा कंपनीला रायगडमध्ये विस्तार रोखून धरला जाईल, कंत्राटदार गब्बर होतात पण हजारो लोकांचा रोजगार धोक्यात येतो हे आम्ही सहन करणार नाही, सुशिक्षित युवकांना रोजगार हवा आहे पण त्याच्या बदल्यात रायगडला विषारी हवा आणि मृत्यूचे भविष्य देणार नाही, कंपनीच्या उद्घाटनाचा नारळ आम्ही फोडला होता आणि पर्यावरणपूरक विस्ताराचाही नारळ आम्हीच फोडणार पण जर रायगडला भोपाळ बनवायचा प्रयत्न केला तर तोच नारळ लोकांच्या रोषात कंपनीच्या डोक्यावर फोडला जाईल, असा जाहीर इशारा घरत यांनी दिला.




