ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

“प्रदूषणाचा राक्षस वाढवणाऱ्या JSW ला रायगडकरांचा जाहीर इशारा!”

“फेज-३ विस्तार म्हणजे पर्यावरणावर थेट हल्ला – ग्रामस्थांचा तीव्र विरोध!”


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : JSW स्टील लिमिटेडचा 10 MTPA ते 15 MTPA इतका प्रकल्पविस्तार (फेज-३) म्हणजे रायगडच्या पर्यावरणावर आणखी एक घाला असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी व नागरिकांनी केला आहे.
22 ऑगस्टला होणाऱ्या जनसुनावणीत या विस्ताराला ठाम विरोध नोंदवला जाणार असून, ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी हरकत सादर केली आहे.
रायगडमध्ये आधीच JSW विरोधातील नाराजी उफाळून आली आहे. आता 22 ऑगस्टला होणारी जनसुनावणी ही केवळ औपचारिकता न राहता स्फोटक जनआक्रोशाचे व्यासपीठ ठरणार आहे.
शेतकरी संघर्ष समितीचे सचिव व शेकापचे जिल्हा पदाधिकारी अनिल परशुराम पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की – “जनतेला फसवून, माहिती लपवून, प्रदूषणाचे राक्षसी कारखाने उभे करू देणार नाही. अन्यथा आम्हाला नवी दिल्लीतील केंद्रीय पर्यावरण अपिल प्राधिकरणाची दारे ठोठावावी लागतील!”
ग्रामस्थांचे आक्रमक आरोप :
EIA रिपोर्ट दडवला! – ग्रामपंचायतींमध्ये पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल उपलब्धच नाही. लोकांना अभ्यासाची संधी नाकारली.
वायू प्रदूषणाचा कहर! – पहाटे दुर्गंधीयुक्त वायूचा त्रास; हवेतील लोखंडी कणांनी नागरिकांच्या फुफ्फुसांची वाट लागली.
धरमतर खाडी ‘विषारी खड्डा’! – JSW मुळे खाडी व उपखाड्या प्रदूषित; शेती, मत्स्यसंपदा आणि इकोसिस्टीम उद्ध्वस्त.
सागरी वाहतुकीचा मारा! – जहाजांच्या लाटांमुळे बांध फुटून खारं पाणी शेतात व गावात शिरते; कंपनी ठोस उपाय करत नाही.
आरोग्याची पर्वा नाही! – कामगार व ग्रामस्थांवर श्वसनविकारांचा प्रकोप; PFT तपासण्या व फिरते दवाखाने शून्य.
स्लॅगचा घातक डोंगर! – कंपनीने टाकलेले स्लॅग म्हणजे रासायनिक कचरा; त्याचा अहवाल जाहीर न करता लोकांना विष देत आहेत.
कार्बन उत्सर्जनाची गुप्तता! – उत्पादनवाढीबरोबर कार्बन क्रेडिट योजना व उपाययोजना लपवण्यात येत आहेत.
पाटील यांनी संतप्त भाषेत हल्ला चढवला –
“JSW चा विस्तार म्हणजे नोकऱ्यांच्या नावाखाली नागरिकांना मृत्यूची भेट. प्रदूषणाची झाकपाक संपली, आता गावकरी रस्त्यावर उतरतील!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button