ताज्या बातम्या
तडजोडीच्या गाळात काँग्रेस रुतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ

रायगड : राजकारणात तडजोड करताना एक मोठा राजकीय पक्ष म्हणून संघटनात्मक पातळीवर काँग्रेसला मोठी किंमत चुकावी लागली आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढू शकलो नाही. युती आघाड्यांमुळे पक्षाला योग्य संधी मिळू शकली नाही, हे वास्तव आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केले.
अलिबाग येथील हॉटेल रविकिरण येथे दोन दिवसीय रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी युवा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर पार पडले. त्याप्रसंगी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आगामी कालावधीत आम्ही कसा गुणात्मक बदल करू शकतो. त्या अनुषंगाने थेट स्वरूपाचा संवाद साधून तो कार्यकर्त्यांपर्यंत शिबिराच्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
हिंदी सक्तीच्या माध्यमातून भाजपा स्वतःचा अजेंडा पुढे भेटत आहे. मनसे आणि शिवसेना यांनी त्याला विरोध करत मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. परंतु 16 एप्रिल रोजी हिंदी सक्तीच्या निर्णयाला काँग्रेसने प्रखर विरोध केला होता. त्यानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला होता. आता भाजपाने पुन्हा हिंदी सक्तीला बळ देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या निर्णयाला विविध पातळीवरून विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेना हे एकमेव हिंदी सक्तीला विरोध करतात असा त्याचा अर्थ होत नाही, याकडेही सकपाळ यांनी लक्ष वेधले.
….