ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

तटकरे यांच्या नेतृत्वाखाली रायगडात नवीन समीकरणांचा खेळ! खोपोली-कर्जतच्या माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश — विरोधकांचे गणित कोलमडले! 


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
रायगड : “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसला अभूतपूर्व बळकटी मिळत आहे. खोपोली ही रायगडमधील सर्वात मोठी नगरपालिका असून, तिचा विकास हा आमचा प्राधान्यक्रम आहे. सर्वांनी एकजुटीने पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवावी आणि लोकांच्या मनात विश्वास निर्माण करावा,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी केले.
तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आज सुतारवाडीतील गीताबाग कार्यालयात झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याने रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे.
खोपोली आणि कर्जत शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यातील विरोधकांचे राजकीय गणितच कोलमडल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
या सोहळ्यात खोपोलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक किशोर पानसरे, माधुरी तांबे (उबाठा गट) तसेच कर्जत येथील राम राणे, हरिश्चंद्र राणे, ऋषी राणे आणि हर्षल मोरे (शिवसेना) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.
प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी नवप्रवेशितांचे मनःपूर्वक स्वागत करत नियुक्तीपत्र प्रदान केले, तसेच सर्वांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस ही विकासाभिमुख विचारसरणीवर उभी असलेली संघटना आहे. खोपोली, कर्जत आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकजुटीने कार्य करणे हेच आपले ध्येय आहे.”
कार्यक्रमादरम्यान आगामी निवडणुकांची रणनीती, उमेदवार निवड, स्थानिक परिस्थिती आणि संघटनवाढ यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button