ताज्या बातम्यारायगड

जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुका 2025 : अंतिम प्रभाग रचना जाहीर


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025 करिता अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना आज शासनाच्या असाधारण राजपत्रात प्रसिध्द झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
या अधिसूचनेच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयातील सूचना फलकावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून रायगड जिल्ह्यातील सर्व तहसील व पंचायत समिती कार्यालयांच्या (पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, उरण, अलिबाग, मुरुड, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर) फलकांवर देखील नागरिकांसाठी पाहण्यासाठी लावण्यात आल्या आहेत.

Related Articles

Back to top button