ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
जनसुरक्षा कायद्याविरुद्ध लढ्याचे रणशिंग फुंकणार, मुंबई परिषद

मुंबई : महायुती सरकारच्या ‘हुकूमशाही प्रवृत्ती’ व सामान्य, निडर नागरिकांच्या मुस्कटदाबीच्या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र तर्फे १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत परिषद आयोजित करण्यात आली आहे.
ही परिषद गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट, मुंबई येथे दुपारी १ ते ५ या वेळेत होणार आहे.
परिषदेतील पुढील रणनीती व सामूहिक कृती जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या परिषदेसाठी शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ, उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व प्रगतिशील पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.