ताज्या बातम्या

पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; विद्यार्थ्यांना सुट्टी, शिक्षक आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज


पालघर | प्रतिनिधी

भारतीय हवामान विभागाने सोमवार, ७ जुलै रोजी पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

📌 कोणाला सुट्टी?

जिल्हा परिषद शाळा

नगरपालिका शाळा

खाजगी व अनुदानित शाळा

आश्रमशाळा

महाविद्यालये

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)

अंगणवाड्या


सदर सुट्टी फक्त विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. कोणत्याही प्रकारची परीक्षा असल्यास त्या पुढे ढकलण्यात याव्यात, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.




⚠️ शिक्षक व कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थिती बंधनकारक

तथापि, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. आपत्ती व्यवस्थापनास मदत करण्यासाठी त्यांना स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानुसार कामकाज करावे लागेल.




☔ पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे संकट कायम

रविवारीही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे काही भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सोमवार ७ जुलै रोजी देखील काही भागांत अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.




✅ सावधगिरीचा उपाय म्हणून प्रशासन अलर्ट

पालघर जिल्हा प्रशासनाने जनतेला विनंती केली आहे की, नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.



Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button