ताज्या बातम्यामुंबईरायगड

ग्राहक फसवणुकीपासून सावध! बँक ऑफ इंडिया रायगड विभागाचे ग्रामसभांद्वारे जनजागरण


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ इंडिया रायगड विभागातर्फे दक्षता जागरूकता अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले.

“सतर्कता: हमारी साझा ज़िम्मेदारी / Vigilance: Our Shared Responsibility” या थीमसह देशभरात 18 ऑगस्ट ते 17 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जागरूकता सप्ताह साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून 24 सप्टेंबर 2025 रोजी रायगड विभागातील सर्व शाखांमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले.

झोनल मॅनेजर दीपन्विता साहनी व डेप्युटी झोनल मॅनेजर भरत सहाय यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या ग्रामसभांमध्ये शाखा व्यवस्थापकांनी ग्राहकांना थेट संवाद साधून विविध फसवणुकीच्या प्रकारांबाबत माहिती दिली. यामध्ये विशेषतः ओटीपी शेअर करू नका, एटीएम पिन किंवा सायबर लिंक उघड करू नका, जास्त व्याजदराचे खासगी कर्ज घेऊन कर्जाच्या विळख्यात अडकू नका याबाबत सूचना करण्यात आल्या.

ग्राहकांना प्रत्यक्ष घडलेल्या सायबर फसवणुकीच्या पद्धतींची उदाहरणे देऊन जागरूक करण्यात आले. ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांना सतर्कतेचे महत्त्व पटवून देत बँकेच्या सुरक्षित व्यवहार पद्धती अवलंबण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमामुळे ग्राहकांमध्ये फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्याबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत होणार आहे, असे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.


Related Articles

Back to top button