ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

गुणवत्ता शर्यतीत रायगडची झेप! लोहोप-चिखली आरोग्य केंद्रांना राज्य मानांकन, लोहोप अव्वल (88.31%)


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील लोहोप व अलिबाग तालुक्यातील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (NQAS) अंतर्गत राज्यस्तरीय प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात प्रथमच दोन केंद्रांना एकाच वेळी मानांकन मिळाले असून लोहोपने तब्बल 88.31 टक्के गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे.

भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत सेवा गुणवत्ता, स्वच्छता, औषध व साधनसामग्री व्यवस्थापन, रुग्ण तपासणी व रुग्ण समाधान या निकषांवर सखोल मूल्यमापन करण्यात आले. राज्य पथकाने सप्टेंबर 2025 मध्ये लोहोप तर नोव्हेंबर 2025 मध्ये चिखली आरोग्य केंद्राची पाहणी केली होती. दोन्ही केंद्रांनी उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय दर्जाच्या सेवांची पूर्तता सिद्ध केली.

या यशाबद्दल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच या गुणवत्तावृद्धी प्रक्रियेत योगदान दिलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राचे दिवंगत आरोग्यसेवक लक्ष्मीकांत भुसारे यांच्या कार्यनिष्ठेचा विशेष उल्लेख करत हे यश त्यांच्या स्मृतीस अर्पण असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.


Related Articles

Back to top button