ताज्या बातम्यामहाराष्ट्ररायगड
गावात भाजी विकायचे, रात्री घरफोडी – दरोडेखोरांची टोळी सापडली
पाली दरोडा प्रकरण उजेडात – राज्यभर दहशत माजवणारे गजाआड

रायगड : पाली परिसरातील हातोंड आणि गोंदाव या गावांमध्ये घरांवर झालेल्या दरोड्याच्या प्रकरणाचा तपास करत रायगड स्थानिक गुन्हे शाखा आणि पाली पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे या आरोपींनी याआधी राज्यातील विविध जिल्ह्यांत दरोडे, चोरी आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले असल्याचे उघड झाले आहे.
अजय एकनाथ चव्हाण (वय 23), आकाश पंजाबराव चव्हाण (वय 20), सुनील प्रकाश चव्हाण (वय 32), मल्हारी भानुदास चव्हाण (वय 30), सोमनाथ भानुदास चव्हाण (वय 30), सुजल महेश चव्हाण (वय 19) अशी अटक करण्यात आलेले आरोपींची नावे आहेत.
26 व 27 जुलै 2025 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांवरून एकाच वेळी अटक केली.
या टोळीतील एक आरोपी टाटा एस वाहनातून भाजी विक्री करताना घरे टार्गेट करत होता. घरात वृद्ध किंवा महिला एकट्या असतील असे ठिकाण निवडून टोळी एकत्र येऊन कट रचत होती.
आरोपींवर यापूर्वी दाखल असलेले प्रमुख गुन्हे:
अजय चव्हाण याच्यावर मुंबई, सातारा, पेण, कोलाड व जेजुरी पोलिस ठाण्यात खुन, चोरी आणि अपघाताचे गुन्हे आहेत.
आकाश चव्हाण याच्यावर परभणी, कोलाड आणि पेण येथे गुन्हे दाखल आहेत.
सुनील चव्हाण याच्यावर मुंबई व बुलढाणा जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार, चोरी, मारहाण यासह गंभीर गुन्हे आहेत.
कारवाई पथक:
तपासासाठी पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली १० पथकांची स्थापना करण्यात आली होती.
…..