ताज्या बातम्यारायगड

“क्षणात घडलं अनर्थ… पण धावलेल्या हातांनी वाचवला जीव!”


रायगड / पाली :

एका तरुणाचा उत्साह आणि निसर्गप्रेम त्याच्या जिवावर बेतणार होता… पण अनोळखी हातांनी वेळेवर धाव घेतली, जीव वाचवला आणि माणुसकी पुन्हा एकदा उभी राहिली!

२ ऑगस्ट रोजी दुपारी ४.५३ वाजता सरसगड किल्ल्यावर ट्रेक करताना निखिल कदम (वय ३०, सातारा — सध्या पुणे) या युवकाचा पाय घसरला आणि तो डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला. हे दृश्य पाहून त्याच्या मित्रांचे पायही थरथरले. पण सुदैवाने आपदा मित्र अमित निंबाळकर यांनी १०८ रुग्णवाहिका सेवा संपर्क साधून मदतीची साखळी सुरू केली.

फक्त पाच मिनिटांत पाली येथील १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. डॉक्टर आणि पायलट उपचाराची बॅग घेऊन थेट गड चढून गेले आणि तात्काळ प्राथमिक उपचार सुरू केले. कोलाड रेस्क्यू टीम आणि पाली आपदा मित्र यांनी मिळून अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर निखिलला सुरक्षितपणे खाली आणले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

त्यानंतर निखिलला पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि पुढील उपचारासाठी MGM हॉस्पिटल, पनवेल येथे हलवण्यात आले.
सध्या त्याची तब्येत स्थिर असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे.

या संपूर्ण रेस्क्यूमध्ये वेळेवर दाखवलेली तत्परता, समन्वय, आणि मदतीची भावना यामुळे एक जीव वाचला. निखिलच्या मित्रांनी आणि कुटुंबीयांनी सर्व मदत करणाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button