“केंद्र सरकारच्या योजनांवर हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही”
दिशा समितीने दिली अधिकाऱ्यांना तंबी

रायगड : केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिशा समितीचे अध्यक्ष खा. श्रीरंग बारणे व सह-अध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी दिला.
दिशा समितीच्या रायगड जिल्ह्यातील बैठकीत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, आवास योजना, जल जीवन मिशन, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन, आरोग्य योजना अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. अपूर्ण कामांबाबत ठेकेदारांवर कारवाई व फेरनिविदांचे निर्देश देण्यात आले.
दिव्यांग मेळावे न झाल्याबद्दल लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. तातडीने आयोजनाचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. पीएम आवास योजनेतील बँकांकडून होत असलेली कर्ज कपात त्वरित थांबवण्याचे आदेशही देण्यात आले.
CSR निधी स्थानिक विकासासाठी वापरण्याचे, तसेच सर्व योजनांची प्रभावी प्रसिद्धी करण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात