क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
काळ्या कोटातून रंगीत जर्सीत! अलिबाग सी-हॉक्स संघ स्पर्धेसाठी नाशिकला रवाना

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्र व गोवा वकील संघटनेच्या वार्षिक स्टेट लेव्हल ॲडव्होकेट प्रीमियर लिग (टी-२०) क्रिकेट स्पर्धेसाठी अलिबाग सी-हॉक्स वकिलांचा क्रिकेट संघ रवाना झाला आहे.
महाराष्ट्र ॲन्ड गोवा बार असोसिएशनच्या वतीने दरवर्षी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाची स्पर्धा नाशिक जिल्हा व अमरावती जिल्हा वकील संघटनेच्या वतीने, ॲड. विवेकानंद रामकृष्ण जगदाळे स्पोर्ट्स फाउंडेशन, नाशिक जिल्हा क्रिकेट ॲन्ड स्पोर्ट्स असोसिएशन, नाशिक बार असोसिएशन व अमरावती बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा दि. २० डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधीत नाशिक येथे होणार असून प्रथम साखळी सामने व त्यानंतर बाद फेरीच्या स्वरूपात सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेसाठी लेदरचा पांढरा चेंडू तसेच खेळाडूंचे रंगीत पोशाख वापरण्यात येणार असून त्यामुळे स्पर्धेची शान अधिक वाढणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र व गोवा राज्यातील सुमारे १०० संघ सहभागी झाले आहेत.
अलिबाग सी-हॉक्स ॲडव्होकेट क्रिकेट संघ :
ॲड. समीर बंगाली (कर्णधार), ॲड. मनीष पाटील (उपकर्णधार), ॲड. महेश म्हात्रे, ॲड. प्रशांत गावंड, ॲड. प्रशांत म्हात्रे, ॲड. गौतम पाटील, ॲड. राहुल मोरे, ॲड. अभिलाष मोरे, ॲड. स्नेहेंद्र पवार, ॲड. पंकज पंडित (यष्टिरक्षक), ॲड. ऋग्वेद ठाकूर (यष्टिरक्षक), ॲड. गौरव लेले, ॲड. कौस्तुभ पुनकर, ॲड. ऋषिकेश माळी, ॲड. हर्षल पाटील, ॲड. रोहित भोईर, ॲड. विशाल जाधव, ॲड. विश्वेश पिकळे, ॲड. राहुल पाटील यांचा संघात समावेश आहे.
या संघाला अलिबाग व रायगड वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांसह क्रिकेटप्रेमींनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवार २० डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता नाशिक येथील संदीप युनिव्हर्सिटीमध्ये होणार असून, यावेळी सुप्रसिद्ध माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच मुंबई, नागपूर, संभाजीनगर येथील न्यायालयांचे न्यायाधीश, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोव्याचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य व सर्व संघांचे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.




