क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
कराटे स्पर्धेत अलिबागचा ‘गोल्डन स्ट्राइक’; अलिबागच्या कराटेपट्टूंचा राष्ट्रीय पातळीवर दबदबा कायम

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
पनवेल |
६वी सोके कप ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन रविवारी (दि. २२ फेब्रुवारी) पनवेल येथे उत्साहात पार पडले. सहा राज्यांतील सुमारे ३२० खेळाडूंनी कटा व कुमिते या दोन्ही गटांत सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे आयोजन क्योशी राजू कोळी यांनी उत्कृष्टरीत्या केले. या स्पर्धेत अलिबागमधील जपान शिटोऱ्यू कराटे-डो इंडिया संघाच्या १५ कराटेपटूंनी ८ डॅन ब्लॅक बेल्ट (जपान) क्योशी राहुल तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली दमदार कामगिरी करत सर्वाधिक १३ सुवर्णपदके पटकावली. त्याचबरोबर “६वा सोके चॅम्पियनशिप-२०२६” चषकावरही अलिबागच्या खेळाडूंनी आपले नाव कोरले.
विजेते कराटेपटू व कामगिरी
ओवी गायकर – कटा (सुवर्ण), कुमिते (सुवर्ण)
श्रीयांस तावडे – कटा (सुवर्ण), कुमिते (सुवर्ण)
मुमुक्षा घरत – कटा (सुवर्ण), कुमिते (सुवर्ण)
सार्थक मोरे – कटा (सुवर्ण), कुमिते (सुवर्ण)
रजाक मुजावर – कटा (कांस्य), कुमिते (सुवर्ण)
रुद्र नाईक – कटा (रौप्य), कुमिते (सुवर्ण)
श्रीनिष मढवी – कटा (कांस्य), कुमिते (सुवर्ण)
हर्षाली जाधव – कटा (रौप्य), कुमिते (सुवर्ण)
त्रीश सुतार – कटा (रौप्य), कुमिते (रौप्य)
हुनर जैन – कटा (रौप्य), कुमिते (कांस्य)
युवराजसिंग दसाना – कटा (कांस्य), कुमिते (कांस्य)
स्वरूप दडस – कटा (कांस्य), कुमिते (कांस्य)
काव्या तुपट – कुमिते (कांस्य)
स्वरांगी दडस – कुमिते (कांस्य)
तनिष्क तावडे – कुमिते (सुवर्ण)
अलिबागच्या कराटेपटूंच्या या नेत्रदीपक यशामुळे शहरात सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. प्रशिक्षक क्योशी राहुल तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबागमध्ये कराटे क्षेत्रात सातत्याने घडणारी ही यशस्वी कामगिरी राज्यस्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे.
अलिबागच्या या यशामुळे रायगड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी उंची मिळाल्याचे मत क्रीडाप्रेमींनी व्यक्त केले आहे.




