उकरुळ शाळेत शिवजयंती उत्साहात; संस्कृतीतून विद्यार्थ्यांना इतिहासाची प्रेरणा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
कर्जत |
गणेश मते
विद्यार्थ्यांना संस्कृती आणि परंपरेतून इतिहासाचे ज्ञान मिळावे तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी या उद्देशाने कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उकरुळ येथे गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शाळेत शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना शिवचरित्राची माहिती देत स्वराज्य, शौर्य आणि आदर्श नेतृत्वाचे महत्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित नृत्य, काव्य सादरीकरण, कथा व घोषवाक्ये सादर केली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश मते, विश्वनाथ थोरवे, पालक संतोष जाधव, अविनाश कदम, आशा रुठे, जयश्री धुळे, हर्षदा जाधव, मीना पालकर, मनीषा खडे, मुख्याध्यापक महेश निर्गुडे, शिक्षक बाळू खोटारे, शिक्षिका रेखा भालसिंग, चेतना सोमणे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान, देशभक्ती व चांगले संस्कार रुजावेत हा मुख्य उद्देश असल्याचे शिक्षकांनी यावेळी सांगितले.




