ताज्या बातम्याक्रीडामहाराष्ट्रमुंबईरायगड

आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने रायगड क्रिकेट – आरडीसीए संकेतस्थळाचे लोकार्पण”

आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते अनावरण


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
रायगड  : जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी, देशाच्या ७९व्या स्वातंत्रदिनानिमित्त आणि महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व पेण विधानसभेचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, असोसिएशनच्या नवीन संकेतस्थळाचे आणि खेळाडूंच्या ओळखपत्राचे अनावरण करण्यात आले.
www.raigaddistrictcricketassociation.com या अद्ययावत संकेतस्थळाचे लोकार्पण आमदार रवींद्र पाटील यांच्या वैकुंठ निवासस्थानी एका शानदार कार्यक्रमात, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
खेळाडू व क्रिकेटप्रेमींसाठी उपयुक्त माहिती
हे नवीन संकेतस्थळ रायगड जिल्ह्यातील खेळाडू, प्रशिक्षक, पालक, पंच, गुणलेखक आणि क्रिकेटप्रेमींसाठी सुलभ व उपयुक्त आहे. यात खालील माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
संघ निवडीसाठी नेमलेल्या सिलेक्टरांची नावे व निवडलेले संघ
संघाबरोबर दौर्‍यावर जाणाऱ्या टीम मॅनेजरची माहिती
विविध वयोगटातील व खुल्या गटातील मुला-मुलींच्या क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक
खेळाडू, पंच आणि गुणलेखकांचे ऑनलाईन नोंदणी फॉर्म
रायगड जिल्ह्यातील क्रिकेटमध्ये प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींची माहिती
असोसिएशनच्या सर्व अधिकृत बातम्या व प्रसिद्धीपत्रके
पारदर्शकता आणि विकासाकडे वाटचाल
या संकेतस्थळामुळे असोसिएशनच्या कामकाजात पारदर्शकता येईल आणि खेळाडू, प्रशिक्षक, पालक तसेच क्रिकेटच्या चाहत्यांना संपर्क साधणे सोपे होईल.
अनावरण प्रसंगी आमदार रवींद्र पाटील यांनी आरडीसीएच्या नवीन कमिटीच्या कामाचे कौतुक केले. महाराष्ट्रातील एका जिल्हा क्रिकेट असोसिएशनने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकले आहे, याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या काळात रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे स्वतःचे मैदान असावे, यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी जाहीर केले.
आभार प्रदर्शन
संकेतस्थळ आणि ओळखपत्र तयार करण्यासाठी ए. जी. सी. इमेजिंग सोल्यूशन्सचे उ. प. चव्हाण आणि गणेश दिलीप शिंदे यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल आरडीसीएच्या वतीने आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमाला रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, खजिनदार प्रशांत ओक, सदस्य कौस्तुभ जोशी, ॲड. पंकज पंडित, प्रदीप खलाटे, मुख्य प्रशिक्षक शंकर दळवी, शेखर भगत, किशोर गोसावी, प्रदीप साळवी, रोहित कार्ले, अभिषेक खातू, प्रवीण आंद्रे यांच्यासह असोसिएशनचे खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button