ताज्या बातम्यामुंबईरायगड

अलिबागच्या डॉ. दिनेश ओसवाल यांचा शिवसेनेत प्रवेश


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग :  शहरातील ज्येष्ठ वैद्यक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिनेश ओसवाल यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
डॉ. ओसवाल हे अलिबाग शहरातील रहिवासी असून स्थानिक पातळीवर त्यांची ओळख एक सक्रीय डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ते अशी आहे. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवले असून स्थानिकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यांच्या प्रवेशामुळे अलिबाग शहरातील शिवसेना संघटनाला बळ मिळणार असल्याचे मानले जाते.
विशेष म्हणजे, डॉ. ओसवाल यांना शिवसेनेत आणण्यात पक्षाचे उपाध्यक्ष शैलेश चव्हाण यांचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पातळीवर डॉ. ओसवाल व शैलेश चव्हाण यांच्यातील चांगले संबंध आणि संघटनात्मक तयारीमुळे हा प्रवेश शक्य झाल्याचे सूत्रांकडून समजते.
अलिबाग नगरपालिकेत गेली 25 ते 30 वर्षे शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे. मात्र आता नगरपालिकेच्या सत्तासमीकरणात बदल घडू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेने स्थानिक पातळीवर आपला प्रभाव वाढवण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्याचाच भाग म्हणून डॉ. ओसवाल यांचा पक्षप्रवेश घडवून आणल्याचे बोलले जात आहे.
नगरपालिकेची निवडणूक डिसेंबर 2025 अथवा जानेवारी 2026 या कालावधीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यांत अलिबागच्या राजकारणात मोठी चुरस पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे.
या प्रवेशप्रसंगी आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले की, “डॉ. ओसवाल यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्ती पक्षात आल्यामुळे शिवसेनेच्या संघटनेला नवी ऊर्जा मिळेल.

Related Articles

Back to top button