ताज्या बातम्या

अमेरिकेच्या दबावाची इंडिया-रशिया दोघांनीच उधळली राख : पुतीन यांचा स्पष्ट इशारा “भारताला देण्यात येणारे इंधनही थांबणार नाही, मदतही थांबणार नाही”

ट्रम्पने टॅरिफचा चाबूक फिरवला… पण पुतीन यांच्या दोन वाक्यांनी अमेरिकेच्या दबावाची हवा काढून टाकली आहे!


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम / डिजिटल डेस्क 
नवी दिल्ली : अमेरिका कितीही धडाधड निर्बंध झाडो, टॅरिफचे फटके मारो, भारताला गुडघ्यावर बसवण्याचा प्रयत्न करो, पुतीन यांच्या एका विधानाने ट्रम्प यांचा संपूर्ण दडपशाहीचा डाव धुळीस मिळाला आहे.
वॉशिंग्टनचा दबाव झुगारत पुतीन म्हणाले,
“भारताला ऊर्जा क्षेत्रात आमचे सहकार्य अखंड चालू राहील… इंधन पुरवठा कधीही थांबणार नाही… आणि भारतीय सैन्याला अधिक सक्षम करण्यासाठी आमची मदत निर्बंधांच्या भीतीने कधीच थांबणार नाही.”
ही घोषणाच म्हणजे थेट अमेरिकेला मारलेला भू-राजकीय फटका आहे. ट्रम्प भारताला कोपऱ्यात ढकलण्याचा जो प्रयत्न करत होते, तो पुतीन यांच्या एका टोकदार घोषणेनं पाण्यातच गेला आहे.
युक्रेन युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कितीही प्रयत्न करत असले तरी त्यांची तथाकथित शांतता योजना कोसळलेली असतानाच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्याने भू-राजकारणाचा संपूर्ण पट बदलला आहे. पुतिन 23 व्या भारत–रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी झाले आणि तिथेच जगाला थेट संदेश दिला. भारतावर दबाव टाकण्याचा अमेरिकेचा खेळ आता चालणार नाही.
पुतीन यांचा अमेरिकेला थेट इशारा
संयुक्त निवेदनात पुतीन म्हणाले, “भारताला ऊर्जा क्षेत्रात आम्ही कोणत्याही प्रकारचे अडथळे न आणता सहकार्य करत राहू. इंधन पुरवठा कधीही थांबणार नाही.” यात त्यांनी अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर थेट वार केला. ट्रम्पने रशियन तेलावर टॅरिफ लावून भारताला रोखण्याचा प्रयत्न केला होता; पण पुतीन यांचा संदेश सरळ आहे की
भारत–रशिया ऊर्जा सहकार्याला न अमेरिका थांबवू शकते, न निर्बंध.
इतकेच नव्हे, त्यांनी आणखी स्पष्ट केले, “भारतीय सैन्य अधिक ताकदवान व्हावे यासाठी रशियाचे सहकार्य कायम राहील.” हा संदेश पेंटागॉनपर्यंत पोहोचायला पुरेसा धारदार आहे.
भारत–रशिया आर्थिक-सैन्य धुरीची मजबुती
मोदी–पुतीन चर्चेत आरोग्य, तंत्रज्ञान, खेळ, ‘मेक इन इंडिया’पासून संरक्षण क्षेत्रातील नव्या करारांना मोठी चालना मिळाली. पुतिन यांनी मोदींचे उघड कौतुक करत म्हटले, “मोदी दबावाखाली येणाऱ्यांपैकी नाहीत. भारताला आपल्या नेतृत्वाचा अभिमान असायला हवा.
व्यापारातील असंतुलनाची मोठी चर्चा
सध्या भारत–रशिया व्यापार 70 अब्ज डॉलर, पण त्यात भारताचा तुटवडा प्रचंड— 65 अब्ज डॉलर आयात, फक्त 5 अब्ज डॉलर निर्यात. रुपया–रूबल निपटान प्रणाली पुढे नेण्याची चर्चा पुन्हा वेगाने सुरू आहे. अमेरिकन डॉलरवर अवलंबित्व कमी करण्याचा दोन्ही देशांचा स्पष्ट प्रयत्न.
S-400 ते Su-57: संरक्षण भागीदारीत नवी उडी
भारत रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र प्रणाली आधीच घेत आहे. आता Su-57 स्टेल्थ फायटर जेट खरेदीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. अमेरिकेच्या CATSAA निर्बंधांचा नेहमीचा धोका असला तरी भारत–रशिया संरक्षण धुरी अजिबात डळमळलेली नाही.
रशियन खतांवर भारताची वाढती निर्भरता
2025 च्या पहिल्या सहामाहीत भारताने 25 लाख टन रशियन खत आयात केले. थेट 33% हिस्सा!
म्हणजे दर तीन टनांपैकी एक टन खत आता रशियातून येते. कृषी सुरक्षिततेसाठी हे निर्णायक.
अमेरिकेच्या तेल निर्बंधांना भारताचा सर्जिकल स्ट्राइक–स्टाइल चकवा
ट्रम्पने रोसनेफ्ट आणि लुकोइलवर निर्बंध लावून भारताला रशियन तेलापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात झाले उलटे. भारताने नोव्हेंबरमध्ये 1.27 दशलक्ष बॅरल प्रतिदिन रशियन तेल घेतले… तेही मध्यस्थांच्या माध्यमातून!
अमेरिकेचा निर्बंधांचा खेळ एकदम सपशेल फुसका ठरला. जगाच्या मानचित्रावर भारत–रशिया अक्ष आता फक्त रणनीतिक नाही… तर अमेरिकेला धडा शिकवणारा ठरला आहे.
…….

Related Articles

Back to top button