क्रीडाताज्या बातम्या

अफगाणिस्तानची माघार शक्य; तिरंगी टी-२० मालिकेवर अनिश्चिततेचे सावट – “अफगाणिस्तानला जमलं, मग भारताला का नाही?” असा प्रश्न


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध वाढलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान संघ येत्या तिरंगी टी-२० स्पर्धेतून माघार घेऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे १७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान होणारी ही त्रिराष्ट्रीय मालिका अनिश्चिततेच्या छायेत गेली आहे.पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान अशा तिन्ही संघांचा समावेश असलेल्या या मालिकेची तयारी जोरात सुरू होती. मात्र सीमावाद आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानने खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करून पुनर्विचार सुरू केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (पीसीबी) पर्यायी नियोजनाचा दबाव निर्माण झाला आहे.क्रीडाविश्वात आता एक नवा प्रश्न रंग घेत आहे — “जर अफगाणिस्तानने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून स्पष्ट आणि धाडसी भूमिका घेतली, तर अशा संवेदनशील परिस्थितीत भारताने नेहमीच खेळ सुरू ठेवण्याचा निर्णय का घेतला?” काही क्रीडा विश्लेषकांच्या मतानुसार, भारतीय क्रिकेट प्रशासनाने अशा प्रसंगी ठाम आणि कठोर भूमिकेची गरज आहे.पीसीबी मात्र या परिस्थितीत नवा पर्याय शोधत आहे. अफगाणिस्तान माघार घेतल्यास दुसऱ्या आशियाई संघाला सहभागी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. श्रीलंकन क्रिकेट संघाने मात्र सहभागाची खात्री दिल्याने स्पर्धेचे बाकी कार्यक्रम कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या घडामोडींनी क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी चर्चा पेटली आहे. सुरक्षेच्या प्रश्नासह राजनैतिक तणावाच्या काळात क्रीडा स्पर्धांचा वापर राजकीय संदेश पोहोचवण्यासाठी करावा का, हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. सर्वांचे लक्ष आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.


Related Articles

Back to top button