ताज्या बातम्याराशिभविष्य

अडचणीतून मार्ग दाखवणारा पितृपक्ष

(यादिवसात पूर्वजांनसाठी इतकेच करा, आपले घर सुख-समृद्धीने भरा)


लेखक : मिलिंद अनंत पाटील – सारळ, अलिबाग(ज्योतिष अभ्यासक) 📞 ९४०४७९१७९८

भाद्रपद महिन्याचे महत्त्व

भाद्रपद महिना जितका गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहे तसाच तो पितृपक्षासाठीही महत्वाचा मानला जातो. या काळात पूर्वजांना मोक्ष मिळवून देण्यासाठी श्रद्धा व परंपरेनुसार केलेल्या कृतींचा समाजात खोलवर प्रभाव असल्याचे मानले जाते.

पितृदोष म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रानुसार, जन्मपत्रिकेत काही अशुभ योगांमुळे पितृदोष असल्याचे सांगितले जाते.

राहू-रवि, राहू-चंद्र, शनी-रवि, शनी-चंद्र अशुभ युती

ही युती केंद्रस्थान (१, ४, ७, १०) किंवा १२व्या स्थानी असेल तर जास्त त्रासदायक

पितृदोष का होतो?

निरपराध व्यक्तीची हत्या

आई-वडिलांची सेवा न करणे

त्यांचा अपमान करणे किंवा म्हातारपणी जबाबदारी न पेलणे

यामुळे पुढील सात पिढ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

पितृदोषाची लक्षणे

पैशांची सतत कमतरता, कर्जबाजारीपणा

कोर्ट प्रकरणे, कामात अपयश

मुलबाळ न होणे किंवा गर्भपात

बढती न मिळणे, मान-सन्मान न मिळणे

अनाकलनीय आजार

सतत मानसिक तणाव

पितृपक्षातील परंपरा

1. श्राद्ध व तर्पण:

मृत व्यक्तीच्या तिथीला आवडीचे पदार्थ तयार करून ताट घराबाहेर ठेवले जाते.

कावळ्याला पान दाखवण्याची परंपरा आहे.

तिथी माहित नसेल तर सर्वपित्री अमावास्येला विधी केला जातो.

2. उपवास:

ज्यांचे आई-वडील नाहीत, त्यांनी आमावास्येला उपवास करणे योग्य मानले जाते.

त्या दिवशी सूर्यास्तानंतर अन्न घेऊ नये.

“ॐ नमो पितृदेवाय नम:” हा मंत्र किमान १०८ वेळा जपावा.

3. पिंडदान:

तीन पिढ्यांमध्ये एकदा तरी पिंडदान केले पाहिजे.

यामुळे अतृप्त आत्म्यांना मुक्ती मिळते.

—-

सोपे पण परिणामकारक उपाय

रोज दुपारी पूर्वजांना जल अर्पण करणे (दक्षिण दिशेला)

पितरांच्या नावाने एक झाड लावून त्याला पाणी घालणे

मुंग्या, कावळा, गाय, कुत्रा, मासे यांना खायला घालणे

भुकेल्याला अन्नदान करणे

हॉस्पिटल, स्मशानभूमी, अनाथाश्रम, वृद्धाश्रम येथे सेवा करणे

महत्त्वाचा दिवस – सर्वपित्री अमावस्या

घराण्याच्या मूळ पुरुषाची आठवण करून प्रार्थना करावी.

“ॐ चैत्यन्य महापुरुषाय नम:” हा मंत्र अडकलेली कामे सोडविण्यास प्रभावी मानला जातो.

या दिवशी अन्नदान व वस्त्रदान अधिक फलदायी ठरते.

निष्कर्ष

पितृपक्ष हा फक्त विधींचा काळ नसून पूर्वजांचा सन्मान आणि सेवाभावाचा काळ आहे.

जिवंत असलेल्या आई-वडिलांची सेवा ही पितृदोष निवारणाची सर्वात सोपी पद्धत आहे.

पूर्वजांना श्रद्धांजली देताना केलेली दानधर्माची कर्मे आयुष्यातील अडचणी कमी करून प्रगतीचे मार्ग दाखवतात.

अस्वीकरण

हा लेख फक्त वाचकांच्या माहिती व श्रद्धाविषयक दृष्टिकोनासाठी आहे. यात दिलेली माहिती ज्योतिषशास्त्र व परंपरेवर आधारित असून ती कोणत्याही वैद्यकीय, कायदेशीर किंवा व्यावसायिक सल्ल्याचा पर्याय नाही. वाचकांनी या माहितीचा वापर स्वतःच्या विवेकाने करावा.

 


Related Articles

Back to top button