ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अजय उपाध्याय यांना राजश्री छत्रपती शाहू पुरस्कार प्रदान; सिन्नर येथील भव्य कार्यक्रमात केला बहुमान


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
सिन्नर 
राजश्री छत्रपती शाहू महाराज समाज गौरव पुरस्कार २०२५ अलिबाग येथील निष्णात कायदेतज्ञ अॅड. अजय उपाध्ये यांना प्रदान करण्यात आला. संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे चेअरमन डॉ. ज्ञानेश्वर सानप यांच्यावतीने आयोजित राजश्री छत्रपती शाहू महाराज समाज गौरव पुरस्कार २०२५ वितरण सोहळा दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी मौजे सिन्नर येथील अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून समाजासाठी आदर्श निर्माण करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.
याच कार्यक्रमात अलिबाग येथील निष्णात कायदेतज्ञ अॅड. अजय उपाध्ये यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल राजश्री छत्रपती शाहू महाराज समाज गौरव पुरस्कार २०२५ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
संस्थेच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन अॅड. अजय उपाध्ये यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या सोहळ्यास बच्चुभाई कडू, रविकांत तुपकर, विवेक कोल्हे,  खासदार भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी मतदारसंघ), पद्मश्री रघुनाथ खेडकर, उत्कर्षा रुपवते, संग्राम शेवाळे, उदयभाऊ सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
…….

Related Articles

Back to top button